fbpx

सलग आठ दिवस बलात्कार; कठूआ पाठोपाठ बलात्काराच्या घटनेने गुजरातही हादरले

mit crime

टीम महाराष्ट्र देशा: जम्मू काश्मीरमधील कठूआ येथील क्रूर बलात्कार आणि खुनाची घटना ताजी असतानाच आता गुजरातमध्येही अशीच घटना उघडकीस आली आहे. एएनआय या वृत्त संस्थेन दिलेल्या माहितीनुसार गुजरातमधील सूरत येथे हा संतापजनक प्रकार घडला आहे. एका ११ वर्षीय मुलीचा सलग ८ दिवस बलात्कार करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. तसेच पिडीत मुलीला अत्यंत निर्दयीपणे मारहाण करण्यात आली. शवविच्छेदन अहवालानुसार पीडीतेच्या मृतदेहावर ८६ पेक्षा अधिक ठिकाणी मारहाणीच्या खुणा आहेत.

६ एप्रिल रोजी सुरत येथे असणाऱ्या पांडेसरा भागातील एक मैदानावर ११ वर्षीय मुलीचा मृतदेह आढळून आला होता. स्थनिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यावर मृतदेह सरकारी रुग्णालायत शवविच्छेदानासाठी पाठवण्यात आला होता. यावेळी पीडीतेवर सलग आठ दिवस बलात्कार झाल्याच शवविच्छेदन अहवालातून समोर आल आहे. तसेच तिच्या गुप्तांगावर देखील गंभीर जखमी केल्याच अहवालात सांगण्यात आल आहे. दरम्यान अद्याप मृतदेहाची ओळख देखील पोलीस पटवू शकलेले नाहीत.