बलात्कार प्रकरणी आणखी एक आरोपी जेरबंद

टीम महाराष्ट्र देशा –  वाढदिवसाची पार्टी करण्यासाठी मित्रासोबत गेलेल्या विवाहितेला कोल्ड ड्रिंकमध्ये दारू पाजून चार जणांनी तिच्यावर बलात्कार केल्या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीच्या दुसर्‍या साथीदाराला आज सकाळी अटक केली. 2 नोव्हेंबला रात्री शहराजवळील टाकळी शिवारात ही घटना घडली होती. सदर विवाहितेने या नराधमांविरोधात चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी अनिल वसंत ठोंबरे या आरोपील काल दुपारी अटक केली होती इतर आरोपींचा पोलिस कसून शोध घेत आहेत. आज सकाळी जगदिश ठोबरे दुसर्‍या आरोपीला पोलिसांनी अटक केली.

You might also like
Comments
Loading...