भाजपचा ‘गली बॉय’; रॅप साँग करणाऱ्या नेत्याचा व्हिडीओ व्हायरल

टीम महाराष्ट्र देशा – लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता शिगेला पोहचली. प्रत्येक पक्ष आपापल्या परीने प्रचाराला सुरुवात केली आहे. मतदारांना खुश करण्यासाठी प्रत्येकजण नवनव्या पद्धतींचा वापर करत असतो. मेरठमध्ये भाजपच्या एका नेत्याने इतक्या जोशात ‘भाजपचा जप’ केलाय की जनतेचे कान सुन्न झाले. सध्या त्यांच्या याच प्रचाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

मेरठ येथे बुधवारी पार पडलेल्या भाजपच्या प्रचार सभेत भाजप नेते विनीत अग्रवाल यांनी ”तुम्हाला कोणत्या पक्षाचा उमेदवार हवा?” असं म्हणत मतदारांसमोर १७ सेकंदात २७ वेळा ”कमळ.. कमळ.. कमळ..” असा जप केला. यावेळी विनीत अग्रवाल यांचा दांडगा उत्साह पाहून व्यासपीठावर उभ्या असलेल्या दुसऱ्या एका नेत्याने त्यांच्यासमोर हात जोडले.

विनीत अग्रवाल यांनी तुम्हाला कमळाची हवे की, दुसर काही….असे म्हणत कमळचे रॅप साँग गायिल्यासारखे कमळ हा शब्द उच्चार करत आहेत. ते म्हणाले, इतके कमळ करा की, लक्ष्मी तुमच्या उंबरठ्यावर, घरी येण्यास मजबूर होईल. त्यावेळी तुम्हला वाटेल की, मोदींच्या रूपात राम घरी आले आहेत. लक्ष्मणच्या रूपात योगी येतील. असे आव्हान त्यांनी केले आहे.

दरम्यान,अग्रवाल यांचे भाषण राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहे.