मुंबई : काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बीकेसीतील जाहीर सभेत अनेक मुद्द्यांवरून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, बाबरीच्या वेळी मी गेलो होतो तीकडे शिवसैनिक नव्हतेच तिथे काय शाळेची सहल होती?
काय तुमचं वय होतं, बोलता काय, तुम्ही काय केलय हिंदुत्वासाठी हे देशाला कळू द्या. तुम्ही जर तिकडे गेला असतात तर बाबरी तुमच्या वजनानेच खाली आली असती, चढायची गरज नव्हती, असा जोरदार टोला लगावला. यानंतर भाजपकडून प्रतिक्रिया येत असताना पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या –