CBIच्या रिपोर्टचा दाखला देत रावसाहेबांनी केला 2 लाख 60 हजार मतांनी विजयी होण्याचा दावा

टीम महाराष्ट्र देशा- भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पुन्हा एकदा वादात सापडण्याची शक्यता आहे. दानवेंनी चक्क CBIच्या रिपोर्टचा दाखला देत आपण 2 लाख 60 हजार मतांनी विजयी होणार असल्याचे एका जाहीर सभेत सांगितले. दानवे यांच्या या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

एका वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. जालन्यात 20 एप्रिल रोजी झालेल्या सभेतील हा व्हिडीओ असून दानवे यांनी आपल्या विजयाचा दावा यात केला आहे. आता CBI ने याबाबतचा कधी सर्व्हे केला? आणि त्याचा रिपोर्ट रावसाहेब दानवे यांना कधी आणि कसा मिळाला याबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.तर भाजप सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करीत असल्याचा तसेच या यंत्रणा भाजपने ताब्यात घेतल्याचा आरोप देखील आता होऊ लागला आहे.

नेमकं काय म्हणाले रावसाहेब ?

मला सीबीआयचा रिपोर्ट मिळाला आहे. या रिपोर्टमध्ये औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात मी सर्वात लोकप्रिय उमेदवार असल्याचे म्हटले आहे. इतक नव्हे तर सिल्लोड सारख्या विधानसभा मतदारसंघात जिथे मला कमी मताधिक्य मिळते. त्या ठिकाणी यंदा 68 टक्के मिळतील तर काँग्रेसला केवळ 28 टक्के मिळतील, असे त्यांनी सांगितले.सीबीआयच्या रिपोर्टनुसार सर्वच तालुक्यात मला यंदा अधिक मते मिळणार असून या सर्व आकडेवारीचा विचार केल्यास मी यंदा 2 लाख 60 हजार पेक्षा जास्त मताधिक्यांनी निवडून येणार.Loading…
Loading...