शब्द माझ्याकडेही आहेत आणि मलाही बोलता येतं;दानवेंचा ठाकरेंना इशारा

टीम महाराष्ट्र देशा – शिवसेना-भाजपमधला वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये अक्षरशः कलगीतुरा सुरु आहे. काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर शेलक्या शब्दात टीकास्त्र सोडले होतं. या टीकेला आता दानवे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Loading...

बीडच्या सभेत ‘रावसाहेब दानवे यांना आता रडवण्याची वेळ आहे’,अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. ठाकरेंच्या टीकेला दानवे यांनी प्रत्युत्तर तर दिलेच आहे पण त्यासोबत गर्भित इशारा देखील दिला आहे.

‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ज्या तऱ्हेची वैयक्तिक टीका करतात त्यावरून त्यांची पातळी समजते. शब्द माझ्याकडेही आहे, मलाही बोलता येतं. उद्धव ठाकरे सगळ्यांवर टीका करतात, पंतप्रधान मोदी, अमित शहा, मुख्यमंत्री तसंच माझ्यावरही टीका करतात हे योग्य नाही’ असं दानवे यांनी म्हटलं आहे.Loading…


Loading…

Loading...