‘रावसाहेब दानवेंनी सांगितला ‘तो’ किस्सा’

RAOSAHEB THAKRE

औरंगाबाद: मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त आज मुख्यमंत्री ठाकरे तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे औरंगाबाद येथे एकाच मंचावर उपस्थित होते. यावेळी त्यांनी एक धम्माल किस्सा सांगितला.

‘जेव्हा मी जिल्हा परिषदेचा सदस्य होतो. त्यावेळी मी नांगराच्या चिन्हावर निवडून आलो होतो. मला तेव्हा ६५ रुपयांचा भत्त्याचा चेक मिळाला होता. मला चेक देताना मॅनेजर चेक देईना. ते मला ओळखेना, कारण मी सभापती असेन असं त्यांना वाटत नव्हतं, बँक अधिकाऱ्याने मला ओळखलं नाही. एवढा लहान सभापती असतो का?, असं बँक अधिकारी म्हणाले. शेवटी माझी ओळख करुन द्यावी लागली, असा किस्सा सांगताच मुख्यमंत्र्यांसह उपस्थितांमध्ये हास्याचे लोट उठले.

तर मुख्यमंत्री ठाकरे यांनी रावसाहेब दानवे यांच्याकडे मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी केंद्राकडे पाठपुरावा करावा अशी मागणी केली आहे. या मागणीला दुजोरा देत मंत्री दानवे यांनी मुख्यमंत्री महोदय तुम्ही नागपूर-मुंबई बुलेट ट्रेनसाठी फक्त माझ्या पाठीशी उभे रहा, पुढचं पुढं मी बघतो, मी पंतप्रधान मोदींना याविषयी कळवेल की, मुख्यमंत्री आपल्या पाठीशी असून आपणही रेल्वेसाठी मदत करत पुढाकार घ्यावा. असे मंत्री दानवे यांनी म्हटले आहे. ते जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यामध्ये आज बोलत होते.

महत्त्वाच्या बातम्या