fbpx

रामाला कुणी हायजॅक करु शकत नाही – रावसाहेब दानवे

ravsaheb danve

टीम महाराष्ट्र देशा : “रामाला कुणी हायजॅक करु शकत नाही, राम हा आम जनतेचा आहे”. असे विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यावर केले आहे. “राम हा काँग्रेसचा नाही, ना भाजपचा, ना शिवसेनेचा तो या देशातील आम जनतेचा आहे”. असेही ते म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या या अयोध्या दौऱ्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहेत. यावर राजकीय नेते वेगवेगळी प्रतिक्रिया देत आहेत. त्यातच रावसाहेब दानवे यांनी अयोध्या यात्रेवरून शिवसेनेवर निशाणा साधला.

तर, “दोन्ही पक्षाने एकत्र आले पाहिजे आणि नक्कीच रामाचे दर्शन घेऊन आल्यावर शिवसेनेत बदल होईल”, असा टोलाही यावेळी दानवेंनी लगावला.

राजकीय वर्तुळात ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. शिवसेनेच्या या दौऱ्यामुळे भाजपाची चांगली गोची झाल्याचे चित्र आहे. शिवसेनेमुळे राम मंदिरच्या राजकारणाला एक नवे वळण आले आहे.

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राम मंदिराचा मुद्दा काढला जात आहे : पवार

राम मंदिरासाठी वटहुकूम काढून दाखवाच;ओवैसींचे भाजपला आव्हान