fbpx

जालन्यातून रावसाहेब दानवेच लढणार, खोतकरांचे बंड रोखण्यासाठी ‘हि’ ऑफर

जालना: जालना लोकसभा मतदारसंघात युतीकडून कोण लढणार हे अखेर निश्चित झाले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पुन्हा एकदा लोकसभेची संधी दिली जाणार आहे. तर दानवे यांच्या उमेदवारीला विरोध करणारे शिवसेना नेते अजून खोतकर यांना कॅबिनेट मंत्रीपदाची ऑफर देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

जालना लोकसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यामध्ये उमेदवार मिळवण्यासाठी संघर्ष निर्माण झाला होता, यंदा तुम्ही थांबा मी लढतो म्हणत खोतकर यांनी दंड थोपटले होते. तर भाजपकडून दानवे यांनाच उमेदवारी देण्याचा आग्रह धरण्यात आला होता. त्यामुळे मध्यंतरी खोतकर हे बंड करणार असल्याची चर्चा होती.

दरम्यान, रावसाहेब दानवे युतीचे उमेदवार असतील हे निश्चित झाले आहे. तर भाजप – सेनेमध्ये ईशान्य मुंबईच्या जागेवर असलेला तिढा मात्र कायम आहे .