Raosaheb Danve | औरंगाबाद : काल शिंदे गटाचे नेते आणि भाजप नेते बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी गेले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटातील नेत्यांनी स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण केले. त्यामुळे राजकीय खळबळ माजली आहे. यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) चांगलेच संतपाले आहेत. स्मृतीस्थळाचे शुद्धीकरण करणाऱ्यांना लाज वाटली पाहीजे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे कोण्या एका गटाचे किंवा एका जातीचे नेते नव्हते, हे जगाला माहित आहे. ते हिंदूह्रदयसम्राट होते. ही पदवी त्यांना देशातील हिंदू बांधवांनी दिली होती. त्यामुळे त्यांच्या दर्शनासाठी कोणीही येऊ शकतो. मात्र दर्शनासाठी गेल्यानंतर गोमूत्र शिंपडूण शुद्धीकरण करणाऱ्यांना त्याची लाज वाटली पाहीजे.”
भारत जोडो यात्रेत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सावरकरांवर केलेल्या वक्तव्यावर देखील दानवे यांनी टीका केली. दानवे म्हणाले, विर सावरकर यांनी ११ वर्ष तुरुंगवास भोगून सुद्धा बाहेर आल्यावर देशाला स्वतंत्र मिळाले पाहीजे हा संघर्ष सुरु ठेवला. सावरकरांनी कधीच इंग्रजांची माफी मागितली नाही. त्यांनी शेवटपर्यंत स्वतंत्र्याचा लढा देत राहिले. त्यामुळे आता कोणी माफी मागितली, असे वक्तव्य करत असेल तर ते इतिहासाची मोडतोड करत आहेत. त्यांना इतिहास माहित नाही.
रावसाहेब दानवे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील घणाघात केला आहे. गांधींसोबत जाणाऱ्यांकडून बाळासाहेबांच्या विचारांचा पराभव झाल्याची टीका दानवे यांनी केली आहे. आदित्य हे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. यावरून विरोधक आदित्य ठाकरेंवर टीका करत आहेत.
महाराष्ट्रात राजकीय खळबळ –
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी वीर सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रात राजकीय खळबळ उडाली आहे. राहुल गांधींचे वक्तव्य म्हणजे वीर सावरकरांचा अपमान असल्याचे भाजपने म्हटले आहे. त्यामुळे शिंदे गोटातूनही काँग्रेस नेत्याचा निषेध सुरू झाला आहे. भारत जोडो यात्रा बंद करण्याची मागणी महाराष्ट्रात सुरू झाली आहे. राहुल गांधींच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस आणि शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी टीका केली आहे. दुसरीकडे वीर सावरकरांचे नातू काँग्रेस खासदाराविरोधात तक्रार दाखल करणार असल्याची चर्चा आहे.
महत्वाच्या बातम्या :
- IPL 2023 | बेन स्टोक्स आणि मयंक अग्रवाल यांच्यावर SRH लावेल मोठा दाव, आकाश चोपडाचा अंदाज
- Raosaheb Danve | गांधींसोबत जाणाऱ्यांकडून बाळासाहेबांच्या विचारांचा पराभव ; दानवेंची आदित्य ठाकरेंवर टीका
- Saamana | “महाराष्ट्राचा हिमालय! त्यांना ढोंग मान्य नव्हते पण…”, सामनाचा विशेष आग्रलेखातून बाळासाहेबांना अभिवादन
- IPL 2023 | एम एस धोनी नंतर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो CSK चा कर्णधार, वसीम जाफरने केले मोठे वक्तव्य
- Narayan Rane | नारायण राणे यांना झटका! कोर्टाच्या आदेशानंतर ‘अधिश’ बंगल्यावर हातोडा