दानवेंनी माझ्या विरोधात जावयाला ५० लाख पुरवले, चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप

chandrakant khaire and raosaheb danve

टीम महाराष्ट्र देशा: औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातील मतदान पार पडल्यानंतर युतीमध्ये नवीन वादाला तोंड फुटले आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आपल्या विरोधात लढणारे हर्षवर्धन जाधव यांना मदत केल्याचा आरोप शिवसेना उमेदवार खा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. जाधव हे दानवे यांचे जावई असल्याने त्यांनी युती ऐवजी जावईधर्म पाळल्याचा आरोप खैरे करत आहेत.

Loading...

दरम्यान, आता रावसाहेब दानवे यांनी त्यांचे जावई अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना ५० लाख रुपये दिल्याचा गंभीर आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. दानवे यांनी पाठवलेली रक्कम पोलिसांनी पकडली, कारवाईत केवळ ५० हजार जप्त केल्याचे दाखवण्यात आले. ज्यांच्याकडून रक्कम जप्त केली त्यांनाही पोलिसांनी सोडून दिले. त्यामुळे दानवेंनी पूर्ण शक्ती लावून प्रकरण दडपले आहे, असा आरोप खैरे यांनी केला आहे.

औरंगाबादमध्ये चौरंगी लढत

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात यंदा चौरंगी लढत झाल्याने चुरस पहायला मिळत आहे, कधीकाळी शिवसेनेत असणारे आ हर्षवर्धन जाधव यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली, त्यामुळे शिवसेनचे उमेदवार खा. चंद्रकांत खैरे यांची डोकेदुखी वाढली आहे. तर वंचित बहुजन आघाडीकडून आ. इम्तियाज जलील आणि कॉंग्रेसकडून सुभाष झांबड लोकसभेच्या मैदानात आहेत.Loading…


Loading…

Loading...