‘मी ‘यांचा’ सगळ्याचा बाप आहे’

Raosaheb_Danve

जालना : भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी बोली भाषेत काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार आणि राज्याचे दुग्धविकास पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यावर टीका करताना जोरदार हल्ला चढवला आहे.रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यामध्ये असलेला दुरावा सर्वश्रुत आहे.यावेळी रावसाहेब दानवे यांनी स्थानिक राजकारणात काँग्रेसचे आमदार अब्दुल सत्तार आणि राज्याचे दुग्धविकास पशुसंवर्धन राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे एकत्र येऊन मला पाडायला बगतात, मात्र मी यांचा सगळ्याचा बाप आहे, असं म्हणत खोतकर आणि पटेल यांच्यावर टीका केली.

नेमकं काय म्हणाले रावसाहेब दानवे ?

“जालना जिल्ह्याच्या विकासासाठी लागेल तेवढा पैसा मी आणू शकतो, पण हे सगळं काहींच्या डोळ्यात येतं. असं चाललं तर रावसाहेब दानवे लई मोठा होईल..आवो चोरो बांधे भारा, आधा तुम्हारा, आधा हमारा… पहले याला पाडा म्हणतात..काहीही करा याला पाडा, रावसाहेब दानवेंना..तिकून तो सत्तार येऊ राहिला..इकडून तो खोतकर येऊ राहिला..रावसाहेब दानवेंना पाडा म्हणतात.तुम्हाला माहीत आहे का, यांची एका एकाची पहली बी पाठ लावली म्या.. अब्दुल सत्तार आणि अर्जुन खोतकर यांनी कधीच माझे काम केलं नाही. त्यांनी आतून बाहेरून बेईमानीच केली, त्यांच्या लक्षात आलं. लपून केलेला खेळ जमत नसल्याने आत्ता उघड एकत्र येऊ राहिले. मी यांचा सगळ्याचा बाप आहे.