चहा विकणारा पंतप्रधान कसा होतो, हीच कॉंग्रेसची सल – दानवे

State BJP chief Raosaheb Danve along with Amar Sable Member of parliament of Rajya Sabha

जालना: कॉंग्रेस व्यतिरिक्त कोणत्याही राजकीय पक्षाचे सरकार टिकून देयचे नाही, एक गरीब चहावाला प्रधानमंत्री होतो, प्रधानमंत्री होण्याचा अधिकार केवळ आम्हाला आहे. एखादा गरीब पंतप्रधान कसा होतो ही कॉंग्रेसची खरी सल असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली आहे. आज आमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण हे ठाम पणे सांगू शकतो. मात्र ते सांगू शकत नाहीत. उत्तर प्रदेशात सपा-बसपाची युती झाली. मायावती. मुलायमसिंह, ममता बॅनर्जी, चंद्रबाबू नायडू या सर्वांनाच पंतप्रधान होण्याची इच्छा असल्याचा टोला देखील दानवे यांनी लगावला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज जालन्यामध्ये भाजप प्रदेश कार्यकारणीची बैठक पार पडत आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व मंत्री, भाजप खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. यावेळी बोलताना दानवे यांनी महाआघाडीवर खरमरीत टीका केली आहे.

महाआघाडी म्हणजे एक सायकलवर, कोणी घोड्यावर तर कोणी गाढवावर दिल्लीला निघाले अशी आहे. मी आणि राहुल गांधी गेली १५ वर्षे लोकसभेत एकत्र आहोत. यांची सर्व गुण आम्हला माहित आहेत. सभागृहात ते ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याबाजूला बसून काय करतात हे सर्वाना माहित आहे. त्यामुळे असा व्यक्ती पंतप्रधान होवू शकत नाही. भाजप कार्यकर्त्यांनी कोणत्याही वर्तमानपत्र किवां चॅनेलमध्ये काय घडत हे बघू नये. असा सल्ला यावेळी दानवे यांनी दिला आहे.

कार्यकर्त्यांनी आपल काम सोडून बाहेरच्या राज्यात काय चाललंय याचा विचार करू नये. अनेक लोक म्हणतात उत्तर प्रदेशमध्ये सपा – बसपा एकत्र आले आहेत. त्यामुळे आपल्याला अवघड आहे. पण या आधी देखील १९९४ मध्ये हे दोन्ही पक्ष एकत्र आले होते. परंतु तेव्हा देखील भाजपा सर्वात मोठी पार्टी म्हणून विजयी झाली, अशी आठवण रावसाहेब दानवे यांनी करून दिली.