इतर पक्षातून आलेल्या कार्यकर्त्यांनीच भाजपला एक नंबर बनवलं – दानवे

नागपूर: भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे याचं वक्तव्य नेहमीच चर्चेचा विषय ठरत आताही दानवे यांनी असचं एक वक्तव्य केलं आहे. निवडणुकीच्या काळात इतर पक्षांतील नेते व कार्यकर्ते भाजपत आले. त्यामुळे आता पक्ष राज्यात आणि केंद्रात क्रमांक एकचा पक्ष झाला आहे. असं विधान करून रावसाहेब दानवे यांनी खळबळ उडवून दिली आहे.

त्याचबरोबर राज्यात काही ठिकाणी राजकीय हतबलता असल्यामुळे आयात करण्यात आलेल्या नेत्यांना सत्तेत किंवा अन्य ठिकाणी स्थान देण्यात आल्याची प्रांजळ कबुली सुद्धा त्यांनी दिली आहे. नागपुरात पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

You might also like
Comments
Loading...