काँग्रेसची माडी कधीही कोसळू शकते,म्हणूनच पवारांनी त्या माडीला टेकू दिला आहे – दानवे

raosaheb danawe

नवी दिल्ली- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक मुलाखत दिली. यावेळी त्यांनी काँग्रेसची स्थितीबद्दल मोठे भाष्य केले आहे. काँग्रेसची अवस्था गतवैभव गमावलेल्या जमीनदारासारखी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान २०२४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांनी आपआपल्या तयारी सुरु केली आहे. यावरुन आघाडीमध्ये मतभेत झाल्याचे पाहायला मिळाले आहे

यानंतर काँग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांनी मांडलेल्या विचारांशी मी सहमत नाही. शरद पवारांच्या विचाराने काँग्रेसच्या विचारांचे नुकसान होणार नाही. पण राज्य घटनेशी, मूलभूत तत्वांशी निगडीत विचारांचे आहेत त्यांनी अशी टीका करण्यापेक्षा बरोबर यावं. शरद पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली यावं, असं मोठं वक्तव्य बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

थोरात यांच्या या विधानाची केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खिल्ली उडवली आहे. काँग्रेसची माडी कधीही कोसळू शकते. म्हणूनच पवारांनी त्या माडीला टेकू दिला आहे, अशा शब्दात रावसाहेब दानवे यांनी काँग्रेसची खिल्ली उडवली आहे. शरद पवार अनेक वर्ष काँग्रेसच्या हवेलीत राहिले आहेत. पण ही माडी मोडकळीस आल्याचं कळताच त्यांनी माडी सोडली. पवारांनी राष्ट्रवादीच्या स्वरुपात नवी माडी बांधली. आता पवारांनी काँग्रेसच्या माडीला टेकू दिलेला आहे. तुमची माडी कधीही पडू शकते हे त्यांनी दाखवून दिलं आहे, असं सांगतानाच बाळासाहेब थोरातांची ऑफर हास्यास्पद आहे. पवारांनी टेकू काढून घेतला तर काँग्रेसची माडी कधीही कोसळू शकते, अशी खोचक टीका दानवे यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या