Raosaheb Danave | मुंबई : सत्ताधारी पक्षनेते आणि विरोधी पक्षनेते एकमेकांवर सतत टीका, टिपण्णी करत असतात. अशातच भाजप पक्षाचे नेते तथा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danave) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले रावसाहेब दानवे (Raosaheb Danave)
आम्ही कोणावर तुटून पडलो नाही. वयाचा एक भाग असतो. त्यांच्या वयोमानुसार त्यांनी वक्तव्य केली पाहिजे. तर, त्यांच्यावर भाजपचा कोणताही नेता तुटून पडणार नाही. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री फडवणीस यांच्यावर पातळी सोडून बोलणं चुकीचं आहे, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. प्रसार माध्यमांशी दानवे यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
तसेच, बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार (Ajit Pawar) महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावले आहेत. त्यावर रावसाहेब दानवे यांनी भाष्य केलं आहे. हा संख्याबळाचा खेळ आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढत जास्तीचे आमदार आले तर, मुख्यमंत्री होऊ शकतात. लोकशाहीत ज्याच्या बाजूने जास्ती लोकं तो या राज्याचा आणि देशाचा राजा. त्यामुळे कोणाच्या बोलण्याने मुख्यमंत्री होत नसतो, असं दानवे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, रावसाहेब दानवे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला आदित्य ठाकरे काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ola Electric Bike | इलेक्ट्रिक स्कूटर आणि कारनंतर Ola लवकरच लाँच करणार आहे इलेक्ट्रिक बाईक
- Virat Kohli । नेदरलँड्स विरुद्ध खेळताना विराट कोहलीचा नवा विक्रम! ख्रिस गेलला टाकले मागे
- Rohit Pawar | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- Car Update | ‘या’ गाड्यांना म्हणता येऊ शकते लाईफ सेविंग कार
- Kishori Pednekar | बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या वादात किशोरी पेडणेकरांची उडी, म्हणाल्या…