Share

Raosaheb Danave | ‘भाजपशी युती नको’, म्हणणाऱ्या अब्दुल सत्तारांवर दानवेंचा हल्ला

मुंबई : आपल्याला माहित आहे की, एकनाथ शिंदे यांनी भाजप पक्षासोबत युती करत राज्यामध्ये सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळे सध्या राज्यामध्ये निवडणुकांचं वारं घुमू लागलं असून, आगामी निवडणुकांमध्ये शिंदे गट आणि भाजप युती करून सोबत निवडणूका लढवणारा का ?, असा सवाल केला जात होता. तर त्यावर भाजप आणि शिंदेगट युती करत एकत्र निवडणूका लढवणार असल्याचं नेत्यांकडून सांगण्यात येतं आहे. परंतू काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी शिंदे गट आणि भाजप युतीवरून एक वक्तव्य केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. अशातच अब्दुल सत्तार यांनी केलेल्या वक्त्वावर भाजप पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले रावसाहेब दानवे ?

आगामी निवडणुकीत आम्ही आमची ताकद दाखवू. त्यानंतर आम्ही एकत्र येत जिल्हापरिषद ताब्यात घेवू. जमलं तर भाई भाई, नाहीतर कुस्ती, असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी अब्दुल सत्तार यांना चांगलंच फटकारलं आहे. रावसाहेब दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

 अब्दुल सत्तार यांचे वक्त्वय –

तसेच, माझ्या मतदारसंघात भाजपाशी युती नको. या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत व्हावी. माझ्याच नाही, तर ज्या ज्या मतदारसंघात माझ्या मतदारसंघाप्रमाणे परिस्थिती असेल त्या त्या मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढती करण्यावर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी विचार करावा. शेवटी निवडून आल्यावर सत्ता स्थापन करताना आपण सोबत राहू, असे अब्दुल सत्तार यांनी म्हटलं होतं

पुढे ते असंही म्हणाले होते, दिल्लीत आणि मुंबईसह जिल्ह्यात, महापालिकेत, जिल्हा परिषदेत सोबत राहू. स्थानिक पातळीवर एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपा असे दोघेच आहोत. त्यामुळे या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण लढत झाली पाहिजे. जो निवडून येईल तो सत्ताधाऱ्यांचा म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचाच कार्यकर्ता असेल.
महत्वाच्या बातम्या :

मुंबई : आपल्याला माहित आहे की, एकनाथ शिंदे यांनी भाजप पक्षासोबत युती करत राज्यामध्ये सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळे सध्या राज्यामध्ये …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics