fbpx

लोकसभेची सेमीफायनल- चंद्रशेखर राव हेच खरे किंग

टीम महाराष्ट्र देशा – आज जाहीर झालेल्या निवडणुकीत तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव हेच खरे किंग ठरले आहेत. निकाल जाहीर झालेल्या पाच राज्यांत इतर चार मुख्यमंत्री आपली सत्ता गमाविण्याची शक्यता आहे. पण राव यांनी आपला गड शाबूत ठेवला आहे.

चंद्रशेखर राव यांनी तेलंगणाची विधानसभा मुदतपूर्व बरखास्त केली होती. त्यांनी त्याचा हा निर्णय योग्य असल्याचे दाखवून दिले आहे. तेलगू देसम आणि कॉंग्रेस यांची युती होऊनही राव यांनी बहुमत राखले आहे. तेलंगणातील एकूण ११९ जागांपैकी टीआरएसने ८४ जागांवर तर भाजप तीन आणि कॉंग्रेस-तेलगु देसम आघाडीने २४  जागांवर आघाडी राखली आहे. हाच कौल कायम राहिला तर राव हे दोन तृतीयांश बहुमताने सत्तेवर येण्याची शक्यता आहे.

राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांची सत्ता गेल्यात जमा आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह यांचही भविष्य अधांतरीत आहे. त्यामुळे राव याचं हे यश ते किंग असल्याचे सिद्ध ठरते.