रोहितदादा पवार मानले राव या माणसाला ! मुंबईच्या डबेवाल्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी झाला ‘ एक दिवसाचा मुंबईचा डबेवाला ‘

टीम महाराष्ट्र देशा: आपल्या मुंबईतील डबेवाल्यांचं कौतुक कोण करत नाही. मुंबईतील डबेवाल्यांची भुरळ कधी – काळी इंग्लंडच्या युवराजालाही पडली होती.आता, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ,शरद पवारांचे नातू आणि कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांनीही मुंबईतील बडेवाल्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत लोकलने प्रवास केला आहे.

माझं कॉलेजचं शिक्षणही मुंबईत झाल्यामुळे मलाही या डबेवाल्यांच्या कामाबाबत खूप दिवसांपासून आकर्षण आहे. मुंबईकरांना गरमागरम घरचं जेवण ऑफिसमध्ये मिळतं पण त्यामागे डबेवाल्यांचे किती कष्ट असतात आणि त्यासाठी जगातला कोणताही मॅनेजमेंटचा कोर्स न करताही हे लोक कसे डबे पोचवतात हे जाणून घेण्यासाठी मी मुंबईत डबेवाल्यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत चर्चगेट ते दादर असा लोकल प्रवास करुन प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेत एक दिवस मीही त्यांच्यातलाच एक डबेवाला होऊन गेलो, असे रोहितदादांनी म्हटले.

Loading...

मुंबईकरांना जागोजागी जाऊन भूकेल्यांच्या पोटात दोन घास भरवणारा मुंबईचा डबेवाला त्यांच्या नियोजनबद्ध कार्यामुळे साता-समुद्रापार पोहोचला आहे. त्यातूनच डबेवाल्यांकडून समाजाभिमूख कार्यातही सहभाग नोंदविण्यात येत आहे. रोहित पवार यांनीही डबेवाल्यांची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

यावेळी त्यांनी एका कामासंदर्भात अजित पवारांना भेटण्याची इच्छा डबेवाल्यांनी बोलून दाखवली. त्यानुसार रोहित यांनी अजित पवारांची भेटही घडवून आणली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
छगन भुजबळांच्या विरोधात गेला तो 'संपला' ! वाचा काय आहे प्रकरण