मुंबई : रणवीर सिंगचा ‘जयेशभाई जोरदार’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याची चर्चा होताना काहीही दिसत नाही. रणवीरच्या चित्रपटाचा पहिलाच दिवस खूप खराब गेला आहे. हा चित्रपट फ्लॉप झाल्याचा अंदाज लोक लावत आहेत.
करोना काळानंतर प्रदर्शित झालेल्या बॉलिवूड चित्रपटांपैकी फक्त दोनच चित्रपट चांगला व्यवसाय करू शकले आहेत. ते दोन चित्रपट म्हणजे ‘सूर्यवंशी’ आणि ‘गंगुबाई काठीयावाडी’ या दोन चित्रपटांशिवाय जे काही हिंदी चित्रपट चित्रपटगृहात पोहोचले ते अयशस्वी ठरले. असाच काही प्रकार ‘जयेशभाई जोरदार’ या चित्रपटाबाबत घडला आहे.
रणवीर सिंग आणि शालिनी पांडे स्टारर चित्रपट ‘जयेशभाई जोरदार’, बऱ्याच वेळानंतर थिएटरमध्ये पोहोचला आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी बॉक्सऑफिसवर अतिशय संथ गतीने सुरवात केली आहे. पहिल्या दिवशी या चित्रपटाने फक्त ३ कोटींची कमाई केली.
RRR’, ‘KGF 2’, ‘गंगुबाई काठियावाडी’ आणि ‘सूर्यवंशी’ या चित्रपटांच्या कथेसमोर रणवीर ची जादू चालली नाही. जयेशभाई जोरदार’ हा चित्रपट कॉमेडीवर आधारित सोशल ड्रामा चित्रपट आहे. त्यामुळे लोक ओटीटी रिलीज ची वाट पाहत आहेत. सिनेमा हॉलमध्ये जायची मेहनत घ्यायची नाही.
महत्त्वाच्या बातम्या :