रणवीरने केला लग्नानंतरच्या प्लॅनिंगचा खुलासा..

रणवीरने केला लग्नानंतरच्या प्लॅनिंगचा खुलासा..

ranveer-singh

मुंबई : तरूणांचा आयकॉन असलेला अभिनेता रणवीर सिंग. हिंदी चित्रपटासृष्टीत हिट असलेल्या अभिनेत्यांपैकी तो एक आहे. दमदार भूमिका साकारून तो सतत चाहत्यांच्या मनावर राज्य करीत असतो. नुकताच त्याने एका शोचे होस्ट म्हणून काम करीत आहे. यानिमित्त काही वैयक्तिक गोष्टींवर चर्चा ही केली आहे.

रणवीर सिंग आणि पत्नी दीपिका पादुकोण यांची जोडी ही लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. नुकताच रणवीरचा एका शोचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. यात रणवीरने त्याच्या लग्नाबद्दल आणि मुलांच्या नावाचा विचार करायला सुरुवात केल्याचे सांगितले आहे. या प्रोमोमध्ये रणवीर त्याच्या लग्नाविषयी आणि मुलांविषयी बोलताना म्हणतो, ‘तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की माझं लग्न झालं आहे आणि आता २-३ वर्षात माझी मुलं होतील. भाऊ, तुमची वहिनी दीपिका लहान असताना इतकी सुंदर होती. मी रोज तिच्या लहानपणीचा फोटो पाहतो आणि म्हणतो की मला अशीच एक मुलगी देना माझं आयुष्य बदलून जाईल. मी तर नाव शॉर्टलिस्ट करत आहे. जर मी तुमचं नाव शौर्य त्या लिस्टमध्ये समाविष्ट केलं तर तुम्हाला काही हरकत नाही ना?’ असे बोलताच प्रेक्षकांनी जोरदार टाळयांनी स्वागत केले.

रणवीर सिंगने ‘द बिग पिक्चर’ या शोमध्ये हा खुलासा केला असून शोच्या सुरुवातीला रणवीर स्पर्धकासह ‘राम लीला गोलियों की रासलीला’ या चित्रपटातील ‘ततड़ ततड़’ या गाण्यावर डान्स केला. त्यानंतर रणवीर स्पर्धकाची ओळख करून देतो आणि म्हणतो, ‘कृपया लक्षात घ्या. त्याचा स्वॅग खूप भारी आहे आणि त्याचा अंदाज शहरात चर्चेचा विषय राहिली आहे. कृपया गोरखपूर, उत्तर प्रदेश येथील अभय सिंह यांचे स्वागत करा.’ असे म्हणताच सर्वांनी टाळयांनी प्रतिसाद दिला.

महत्त्वाच्या बातम्या