रणवीर-माहीची गळाभेट ; मैदानात दिसली दोघांची यारी

dhoni ranvir

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणवीर सिंह नेहमीच आपल्या अतरंगी स्टाईलमुळे चर्चेत असतो. तसेच रणवीरला बॉलीवूडमध्ये यारांचा यार म्हणून देखील संबोधले जाते. अशीच एक यारी रणवीरच्या चाहत्यांना पाहायला मिळली.

टीम इंडियाचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनी बरोबर असलेल्या बॉन्डिंगमुळे सध्या रणवीर चर्चेत आला आहे. रणवीर आणि धोनी नुकतेच मुंबईतील एका स्टेडियमममध्ये फुटबॉल खेळताना दिसले. याच मैदानावर रणवीर आणि धोनीमध्ये जिगरी यारी पाहायला मिळली. या फुटबॉल मैदानावरील दोघांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये हे दोघं एकमेकांशी बोलताना तसंच जवळच्या मित्रांप्रमाणे गळाभेट घेताना दिसत आहेत.

त्यांची ही यारी पाहून रणीवर तसेच धोनीचे चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत. रणवीर आणि धोनी हे दोघंही ऑल स्टार फुटबॉल क्लबचे सदस्य आहेत. धोनी आणि रणीवरनं  रविवारी या फुटबॉल  स्टेडियमममध्ये एकत्र फुटबॉलचा सराव केला. या सरावादरम्यानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या