अलिबागमध्ये रणवीर-दीपिकाने तब्बल 90 गुंठे जागा केली खरेदी

मुंबई : बॉलीवुडमध्ये  नेहमीच उत्साहात असणारा अभिनेता रणवीर सिंह त्याच्या कामामध्ये देखील असा उत्साह कायम ठेवत असतो. तसेच रणवीरची पत्नी प्रसिध्द अभिनेत्री दीपका पदुकोन हे देखील तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वत्र ओळखली जाते. त्यांच्या चित्रपटाची नेहमीच चर्चा रंगलेली असते. मात्र आता त्यांनी अलिबागमध्ये तब्बल 90 गुंठे जागा खरेदी केलेल्या जागेमुळे त्यांची चर्चा सुरु झाली आहे.

अलिबागमधील मापगाव या भागात त्यांनी ही जागा जवळपास 22 कोटी रुपयांमध्ये खरेदी केली आहे. या जागेच्या रजिस्ट्रेशनसाठी या जोडीने काल अलिबागच्या रजिस्ट्रार कार्यालयात हजेरी लावली होती. यावेळी या दोघाना पाहण्यासाठी अनेकांनी एकच गर्दी केलिया होती.

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंहची जोडी चाहत्यांमध्ये खूप पसंत केली जात आहे. रणवीर आणि दीपिका हे बॉलिवूडमधील सर्वोत्तम जोडप्यांपैकी एक मानले जातात. दीपिका आणि रणवीरने  ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’ सारखे हीट चित्रपटात एकत्र काम केले आहे.

रामलीलाच्या सेटवर रणवीर आणि दीपिकाची जवळीक वाढली होती. दोघांनी रामलीलाच्या सेटवरच एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. दीपिकाने 2018 मध्ये इटलीच्या मोकामा लेक येथे बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंहसोबत लग्न केले होते

.