स्टेशनवर गाणाऱ्या रानूला हिमेश रेशमियाने दिला ब्रेक; रेकॉर्ड केलं पहिलं गाणं

blank

टीम महाराष्ट्र देशा:- दिग्गज गायिका लता मंगेशकर यांच्याशी मिळती-जुळती आवाज असणारी रानू मंडलचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात ती लता मंगेशकरचे प्रसिद्ध गाणे ‘प्यार का नगमा’ गाताना दिसली होती. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राणूचे भाग्य चमकले अखेरतिला बॉलीवूडमध्ये पहिली संधी मिळाली. राणूला हा ब्रेक प्रसिद्ध संगीतकार हिमेश रेशमियाने दिला आहे.राणू मंडल या स्टेशनवर भीक मिळावी म्हणून गाणे गायच्या या गाण्यामुळे आत्ता त्याचे आयुष्य बदले आहे.

शुक्रवारी त्यांनी एक व्हिडिओ शेअर केला त्यात त्याने राणूला आपल्या आगामी ‘हॅप्पी हार्डी अँड हीर’साठी गाणे रिकार्ड करून घेतले. हा व्हिडिओ दिवसभर व्हायरल झाला. तो १७ लाख तासात अडीच लाख लोकांनी पाहिला. तो व्हिडिओ भारतात हा टॉप ३ ट्रेंडिंग व्हिडिओमध्ये राहिला.यात राणू मंडल हिमेश रेशमियासोबत स्टुडिओमध्ये गाणे रेकॉर्ड करताना दिसत आहेत.

दरम्यान राणू मंडल लवकरच रिअॅलिटी शो सुपरस्टार सिंगर नावाच्या शोमध्ये दिसणार आहेत. यात त्या हिमेश आणि जजेससोबत शोमध्ये सहभागी होणाऱ्या मुलांची भेट घेतील आणि आपले गाणेही सादर करतील. हिमेश म्हणाला की, सलमानचे वडील सलीम अंकलनी मला एकदा सल्ला दिला होता की, जेव्हाही तुला टॅलेंटेड माणूस आढळून येईल, त्यांना जाऊ देऊ नको. ते मला असेही म्हणाले होते की, त्या व्यक्तीला आपल्या टॅलेंटच्या जोरावर पुढे जाण्यासाठी मदत जरूर कर.