राणू मंडल पुन्हा चर्चेत , पटकावले गूगलच्या सर्च लिस्टमध्ये स्थान

टीम महाराष्ट्र देशा :  प्रत्येक वर्षाच्या अखेरच्या महिन्यात गूगल वर्षभरात सर्वाधिक सर्च करण्यात आलेल्या व्यक्तींच्या नावांची यादी जाहीर करते. यंदाही यादी जाहीर करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे या यादीत ‘राणू मंडल’चेही नाव आहे. टॉप १० व्यक्तींच्या सर्च लिस्टमध्ये ७ व्या क्रमांकावर आहे. पण सर्वांना थक्क करणारी बाब ही आहे की, या यादीत बॉलीवूडमधील नावाजलेल्या चेहऱ्यांपैकी एकाचेही नाव नाही. मात्र राणू मंडलने सर्वात वरचे नाव पटकावले आहे.

राणू मंडल या रेल्वे स्टेशनवरती गाणे गाऊन त्यांचे पोट भरत होत्या. अशामध्ये एका व्यक्तीने त्यांचा गाने गातानाचा व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मिडियावरती टाकला.काही दिवसातच त्यांचे गाणे खूप व्हायरल झाले.लोकांना त्यांचा आवाज आवडू लागला. बॉलीवूड सिंगर हिमेश रेशमियाने त्यांच्या ‘हैप्पी हार्ड एंड हीर’ चित्रपटात गाण्याची संधी दिली.लगेचचं तीन गाणे रेकॉर्ड पण केले. त्यातील दोन गाणे रिलीज झाले आहेत. राणू मंडल आता प्रसिद्ध सिंगर झाल्या आहेत.

Loading...

राणू मंडलनंतर गुगलच्या यादीत अभिनंदन वर्धमान, लता मंगेशकर, युवराज सिंह, आनंद कुमार, विक्की कौशल, ऋषभ पंत, तारा सुतारीया, सिद्धार्थ शुक्ला, कोएना मित्रा यांच्या नावांचा समावेश आहे. तसेच एअर फोर्स विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे फेब्रुवारी २०१९ मध्ये चर्चेत आले होते.भारताने २६ फेब्रुवारी रोजी बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर निशाणा साधला होता.याला प्रत्युत्तर म्हणून दुसऱ्या दिवशी पाकिस्तानने हवाई हमले करत भारताच्या हवाई सीमा ओलांडल्या होत्या. पाकिस्तानच्या लढाऊ विमानाशी झुंजताना वर्धमान यांचे विमान दुर्घटनाग्रस्त झाले आणि पाकिस्तानच्या सीमेत जाऊन पडले होते. पाकिस्तानी लष्कराने त्यांना ताब्यात घेतले आणि भारताच्या प्रयत्नामुळे त्यांना तीन दिवसात सोडण्यात आले. म्हणून वर्धमान महावीर हे सर्वाधिक वेळा गुगलवर सर्च केले गेले.

महत्वाच्या बातम्या

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
लोकप्रियतेत ‘तान्हाजी’चाच जयजयकार, अजय देवगन बनला नंबर 1 बॉलीवूड स्टार !!!
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
राजकीय पक्षांचा कोणताही बंद महाराष्ट्रातील व्यापारी यापुढे पाळणार नाहीत
शिवसेनेबाबतच्या 'त्या' वक्तव्यामुळे टीकेचे धनी झालेले चव्हाण आता म्हणतात...
वारकरी संतापले ; उद्धव ठाकरे तुम्ही आषाढी एकादशीला शरद पवारांचाच अभिषेक करा
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
दिल्लीत मोठ्या थाटात प्रचाराला गेलेल्या तावडेंना केजारीवालांनी बेक्कार झापलं
'शाहीनबाग आंदोलनातील बहुतांश लोक हे पाकिस्तानी आणि बांगलादेशी'
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...