पूरग्रस्तांच्या मदतीसाठी खा. रणजितसिंह निंबाळकर सरसावले, केली 25 लाखांची मदत

blank

टीम महाराष्ट्र देशा : कोल्हापूर – सांगली आलेल्या महापुरामुळे दोन्ही जिल्ह्यात हलाकीची परिस्थिती आहे. अनेक नागरिक अन्न , वस्त्र , निवारा या मुलभूत गरजांपासून वंचित आहेत. त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांसाठी संपूर्ण राज्यातून मदत केली जात आहे. अनेक नेत्यांनी वैयक्तिक मदत केली आहे. माढा खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी स्वतः मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 25 लाख 52 हजार 852 रुपये जाहीर केले आहेत. तर या रक्कमेचा धनादेश त्यांनी सबंधित खात्याकडे सुपूर्त केला आहे.

blank

फलटण शहरामध्ये सर्वपक्षीय नेते मंडळींच्या वतीने आणि सर्व सामाजिक संघटनांच्या वतीने कोल्हापूर ,सांगली या ठिकाणी आलेल्या पूरग्रस्त बांधवांना मदत करण्यासाठी रविवारी फेरी काढण्यात आली होती. यावेळी फलटण शहरातील छोटे-मोठे व्यवसायिक, नागरिक यांनी उस्फूर्तपणे प्रतिसाद देत पूरग्रस्त लोकांना मदत केली. यामध्ये खाद्यपदार्थ, कपडे, औषधे अशा अनेक बाबी लोकांनी मदत म्हणून दिल्या आहेत.

या वेळी माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्वतः मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 25 लाख 52 हजार 852 रुपये जाहीर केले. तर या रक्कमेचा धनादेश सुपूर्त करण्यात आला. या वेळी त्यांनी केलेल्या अहवालानुसार अनेक स्वयंसेवी संस्थांनी धनादेशच्या रूपाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत केली.

महत्वाच्या बातम्या