माढा लोकसभा : रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या संपत्तीचे आकडे बघून विरोधक ही अचंबित

blank

फलटण : माढा लोकसभा मतदारसंघाची चर्चा या ना त्या कारणाने सातत्याने देशाच्या आणि राज्याच्या राजकारणात होत असते. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर उमेदवार ठरवण्यापासून ते या पक्षातून त्या पक्षात नेत्यांचे जाने असो की, शरद पवार उभा राहणार, त्यानंतर पवारांची माघार, यासह अनेक घडामोडी झाल्या आणि पुढे सातत्याने होताना दिसत आहेत.

आता फलटणचे हे रणजितसिंह निंबाळकर चर्चेत आलेत ते त्यांच्या संपत्तीच्या विवरणामुळे रणजितसिंह नाईक निंबाळकर कुटुंबाच्या नावावर तब्बल 120 कोटी 32 लाखांची मालमत्ता आहे. मात्र, त्याच अब्जाधीश रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर वेगवेगळ्या कारणांसाठी बँकांकडून घेतलेलं 89 कोटींचं कर्जही आहे. तसंच आयकर विभागाची तब्बल 56 लाख 78 हजाराची थकबाकी देखील आहे.

रणजितसिंह नाईक निंबाळकर हे सातारा जिल्ह्यातील निंभोरेचे रहिवासी आहेत. त्यांनी सोमवारी (1 एप्रिल) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीचं विवरण दिलं. 2014 मध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकरांचं उत्पन्न 61 लाख 53 हजार होतं, तर 2019 त्यांची संपत्ती 3 कोटी 64 लाखांवर पोहोचलं. म्हणजेच त्यांच्या संपत्तीत सुमारे तीन कोटी वाढ झाली आहे.
शेतजमीन, राहतं घर, व्यायसायिक इमारती, कारखाने अशी एकूण 64 कोटी 60 लाखांची स्थावर मालमत्त आहे. तर पत्नीच्या नावावर 10 कोटी 12 लाख, मुलगा ताराराजेंच्या नावे 3 कोटी 26 लाख आणि इंद्रराजेंच्या नावे 3 कोटी 24 लाख रुपयांची संपत्ती आहे.