fbpx

‘माढा शरद पवारांना पाडा’ ही पोस्ट संजय शिंदेंचीचं

टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे माढा मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. त्यावेळी ‘माढा शरद पवारांना पाडा’ अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होती. यामध्ये संजय शिंदे यांचा हात होता असा गौप्यस्फोट माढा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दैनिक लोकमतशी बोलताना केला आहे.

रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांचा पराभव केला आहे. माढा मतदारसंघाची लढाई ही भाजप आणि राष्ट्रवादीने अत्यंत प्रतिष्ठेची बनवली होती. परंतु भाजपचे निंबाळकर हे शिंदे यांना वरचढ ठरले. लोकमतशी बोलताना निंबाळकर यांनी निवडणुकीआधी व्हायरल झालेल्या पोस्टचा उल्लेख केला.

‘माढा शरद पवारांना पाडा’ अशी पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल केल्याने शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली. ही पोस्ट व्हायरल करण्यामागे राष्ट्रवादीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय शिंदे यांचा हात होता. तसेच ही पोस्ट तयार करताना शिंदे यांच्यासोबत चर्चा झाली होती असंही निंबाळकर म्हणाले.

दरम्यान, ‘निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी संजय शिंदे यांना जिल्हा परिषद अध्यक्षपदावरुन हटविण्यात येईल. यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे असंही निंबाळकर म्हणाले आहेत.