‘मी ओरिजनल नाईक-निंबाळकर, रामराजे ही बिनालग्नाची औलाद’

टीम महाराष्ट्र देशा – राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानल्या हेलेल्या सोलापुरातील माढा लोकसभा मतदारसंघात भाजपने दैदिप्यमान विजय मिळविला आहे. माढ्यातून भाजपचे रणजितसिंह निंबाळकर विजयी झाले असून त्यांनी राष्ट्रवादीचे संजय शिंदे यांचा पराभव केला आहे. रणजितसिंह यांनी हा विजय नम्रपणे स्वीकारणे अपेक्षित असताना रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी वादग्रस्त विधान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. रणजितसिंह यांनी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकरांवर पातळी सोडून टीका केली आहे.

रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे माढ्यातून तब्बल ८५ हजारांच्या मताधिक्याने विजयी झाल्यानंतर त्यांच्या फलटण येथे विजयीसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी विधानपरिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकरांवर जोरदार टीका केली.

काय म्हणाले रणजितसिंह नाईक निंबाळकर?

“मी ओरिजनल नाईक-निंबाळकर आहे. माझा डीएनए तपासला तर या रणजितसिंहाच्या ९६ पिढ्या नाईक-निंबाळकरच निघतील. परंतु तुमचं काय? तुम्ही स्वत:ला नाईक-निंबाळकर म्हणवता, आणि मी नाईक-निंबाळकर नाही म्हणून सांगता? तुमच्या आईचं आणि वडिलाचं लग्न झालं असेल? त्या लग्नाचा दाखला मला दिला तर त्याला एक हजाराचं बक्षिस देईन. रामराजे ही बिनालग्नाची औलाद आहे, हा इतिहास आहे. रामराजेंच्या वडिलांना मालोजीराजेंनी घरात घेतलं नव्हतं. त्यामुळे मला वाईट बोलायचं नव्हतं, परंतु बोलावं लागलं”

कोण आहेत रणजितिसंह नाईक निंबाळकर?

रणजितसिंह ना. निंबाळकर हे विद्यमान माढ्याचे खासदार आहेत. ते माजी खासदार हिंदुराव ना. निंबाळकर यांचे चिरंजीव आहेत. स्वराज उद्योग समुहाच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रमाणात युवा वर्ग आपल्याकडे आकर्षित केला आहे. १९९६ साली रणजितसिंहांचे वडील हिंदूराव ना. निंबाळकर यांनी शिवसेना – भाजप युतीकडून लोकसभा निवडणूक लढवत सातारा लोकसभा मतदारसंघात आश्चर्यकारकरित्या विजय मिळवला होता.