रणजितसिंह मोहिते-पाटलांना मिळणार विधानपरिषदेचे तिकीट ?

टीम महाराष्ट्र देशा : विधानपरिषदेचे माजी सभापती आणि काँग्रेस सदस्य शिवाजीराव देशमुख यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या जागेसाठी ७ जूनला पोटनिवडणूक होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.

विधानसभेतील आमदार या पोटनिवडणुकीत मतदान करणार आहेत. विधानसभेतील संख्याबळामुळे ही लढत एकतर्फी होऊन सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या महायुतीला ही जागा मिळण्याची दाट शक्यता आहे.दरम्यान, या रिक्त जागेवर राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देवून भाजपमध्ये दाखल झालेले खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांची वर्णी लागू शकते अशी शक्यता निर्माण झाली आहे.

Loading...

ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह यांनी राष्ट्रवादीला राम-राम ठोकला होता. भाजपचे माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा जोरदार प्रचार केला होता. मोहिते-पाटलांनी आपली सर्व यंत्रणा कामाला लावल्याने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला या ठिकाणी चांगलेच झुंजावे लागत आहे. रणजितसिंह यांच्या रूपाने भाजपला पश्चिम महाराष्ट्रात एक तगडा आणि तरुण नेता मिळाला असल्याने भाजप त्यांना विधानपरिषदेवर पाठवून त्यांचे पंख आणखी बळकट करेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार शिवसेना-भाजप महायुती ही काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या वरचढ ठरणार आहे. येत्या सात जून रोजी या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. विधानसभेच्या 288 जागांपैकी भाजपचे 122, तर शिवसेनेचे 63 आमदार आहेत. काँग्रेसचे 42, तर राष्ट्रवादीचे 41 आमदार आहेत. सात अपक्ष, तर छोट्या पक्षांचे 13 आमदार आहेत.

विधानसभेतील संख्याबळ

भाजप – 122

शिवसेना – 63

काँग्रेसचे – 42

राष्ट्रवादी – 41

शेकाप – 03

बविआ – 03

एमआयएम – 02

मनसे – 01

सप – 01

भारिप – 01

माकप – 01

रासप – 01

अपक्ष – 07

एकूण – 288

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

टीकाकारांच्या नाकावर टिच्चून इंदुरीकर महाराजांची मोशीत काढली मिरवणूक
शिवसेनेचा 'ढाण्यावाघ' ऊझबेकिस्थानात
'पुन्हा निवडणुका झाल्यास भाजपाच्या आमदारांची संख्या १०५ वरुन पंधरावर येईल'
इंदोरीकर महाराजांच्या 'त्या' वक्तव्यावर सिंधुताई सपकाळांची लक्ष्यवेधी प्रतिक्रिया
मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
फक्त विधानसभा कशाला लोकसभेच्या देखील निवडणुका घ्या, पवारांनी फडणवीसांना ललकारलं
इंदुरीकर महाराज समर्थकांकडून तृप्ती देसाईंचे होणारे चारित्र्यहनन महिला प्रतिनिधींना दिसत नाही का?
परळीतील 'त्या' प्रकरणातील आरोपींना अटक, कोणाचीही गय केली जाणार नाही - धनंजय मुंडे
राजकीय भूकंपाची शक्यता ; भाजपच्या २५ नाराज आमदारांची बैठक
‘सामना’मध्ये छापून आलेल्या नाणार प्रकल्पाच्या जाहिरातीवर मुख्यमंत्री ठाकरेंनी केली भूमिका स्पष्ट, म्हणाले...