नाशिकच्या रंजिता शर्मा यांना मिसेस महाराष्ट्र पॉप्युलरचा बहुमान

Ranjita Sharma

नाशिक : सौंदर्य आणि बुध्दीमतेच्या निकषात महाराष्ट्र २०१७ च्या अंतिम फेरीत धडक मारणा-या नाशिकच्या रंजीता शर्मा यांना मिसेस महाराष्ट्र पॉप्युलर २०१७ हा बहुमान मिळाला आहे. दिवा पॅजेंटस यांच्या विद्यमाने आयोजित मिसेस महाराष्ट्र २०१७ ची अंतिम फेरी पुणे येथील हिंजवाडी येथे एका तारांकीत हॉटेल मध्ये पार पडली.

नाशिकमध्ये प्राथमिक फेरीत बाजी मारून पुण्यात राज्यातील अन्य सौंदर्यवतींशी स्पर्धा करण्याचे आव्हान त्यांनी पार पडले. स्पर्धेच्या अंतिम फेरीपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून आयोजकांनी मते मागवली होती. त्यानंतर अंतिम फेरीतही बुध्दीचा कस लागला. त्यात वीस स्पर्धकांमधून शर्मा यांची मिसेस महाराष्ट्र पॉप्युलर बहुमानासाठी निवड झाल्याची घोषणा करण्यात आली.

यावेळी शर्मा यांना मानाचा मुकूट प्रदान करण्यात आला. शर्मा या नाशिकच्या आरोग्य विभागात कार्यरत असून यापूर्वी जिल्हा शासकिय रूग्णालय तसेच कळवण येथील आरोग्य केंद्रातही त्यांनी काम केले आहे. कुपोषण आणि आजार टाळण्यासाठी संतुलीत आहार हे त्यांचे अभ्यासाचे विषय असून त्यांनी ठिकठिकाणी व्याख्याने दिली आहे. सध्या त्या नाशिकच्या विभागीय संदर्भ रूग्णालयात आहारतज्ज्ञ म्हणून काम करीत आहेत. त्यांच्या यशाबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे