मुंबई : रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना (Ranji Trophy 2022 Final) मध्य प्रदेश आणि मुंबई यांच्यात खेळवला जात आहे. मुंबईच्या पहिल्या डावाला मध्य प्रदेशच्या फलंदाजांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवसअखेर मध्य प्रदेशने १२३ षटकात ३ बाद ३६८ धावा केल्या आहेत. रजत पाटीदार ६७ धावांवर नाबाद आहे. मध्य प्रदेश अवघ्या ६ धावांनी पिछाडीवर आहे.
मध्य प्रदेशचा पहिला डाव
मध्य प्रदेशचा सलामीवीर हिमांशू मंत्रीने ३१ धावांचे योगदान दिल्यानंतर दुसरा सलामीवीर यश दुबे आणि शुभम शर्मा यांनी मुंबईच्या गोलंदाजांची पिसे काढली. या दोघांनी द्विशतकी भागीदारी करत वैयक्तिक शतके ठोकली. मोहित अवस्थीने शुभमला हार्दिककरवी झेलबाद करत ही भागीदारी मोडली. शुभमने १५ चौकार आणि एका षटकारासह ११६ धावा केल्या. दीडशतकाकडे वाटचाल करणाऱ्या यशला शम्स मुलीनीने बाद केले. यशने १४ चौकारांसह १३३ धावा कुटल्या. त्यानंतर रजत पाटीदारने अर्धशतक ठोकत तिसऱ्या दिवशी संघाची पकड मजबूत केली. तिसऱ्या दिवसअखेर पाटीदारने १३ चौकारांसह नाबाद ६७ धावा केल्या. कप्तान आदित्य श्रीवास्तव ११ धावांवर खेळत आहे.
That's Stumps on Day 3 of the @Paytm #RanjiTrophy #Final! #MPvMUM
Madhya Pradesh ended the Day at 368/3.
Mumbai scalped a wicket each in the 2nd & 3rd Session.
We will be back for the Day 4 action tomorrow.
Scorecard ▶️ https://t.co/xwAZ13D0nP pic.twitter.com/Xoszp8yKmI
— BCCI Domestic (@BCCIdomestic) June 24, 2022
मुंबईचा पहिला डाव
नाणेफेक जिंकलेल्या मुंबईने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात ३७४ धावा केल्या आहेत. मुंबईकडून सरफराज खानने सर्वाधिक धावा केल्या. त्याने २४३ चेंडूत १३४ धावांची खेळी केली. तत्पूर्वी, सलामीवीर पृथ्वी शॉने ४७ आणि यशस्वी जयस्वालने ७८ धावांचे योगदान दिले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अरमानने २६ धावा केल्या. मध्य प्रदेशकडून गौरव यादवने ४ बळी घेतले. त्याचवेळी अनुभव अग्रवालने मुंबईच्या ३ फलंदाजांना बाद केले.
दोन्ही संघांची Playing 11
मुंबई : पृथ्वी शॉ (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, अरमान जाफर, सुवेद पारकर, सरफराज खान, हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), शम्स मुलानी, तनुष कोटियन, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे आणि मोहित अवस्थी.
मध्य प्रदेश : यश दुबे, हिमांशू मंत्री (यष्टीरक्षक), शुभम शर्मा, रजत पाटीदार, आदित्य श्रीवास्तव (कर्णधार), अक्षत रघुवंशी, सारांश जैन, कुमार कार्तिकेय, अनुभव अग्रवाल, गौरव यादव आणि पार्थ साहनी.
महत्त्वाच्या बातम्या –