माढा मतदासंघानंतर पंढरपूर धूळ चारणार हे मी अगोदरच सांगत होतो – निंबाळकर

ranjeetsinh naik nimbalkar

पंढरपूर – पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूकीत भाजपाचे समाधान आवताडे विजयी झाले आहेत. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भगीरथ भालके यांचा 3,733 मतांनी पराभव केला.

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी चुरशीची लढत झाली. राष्ट्रवादीसह भाजपानेही प्रतिष्ठेच्या केलेल्या या पोटनिवडणुकीची मतमोजणी काल पंढरपूर इथं पार पडली. या निवडणूकीसाठी 2 लाख 24,068 मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता.

दरम्यान, या निवडणुकीच्या निकालानंतर सत्ताधारी आणि महाविकास आघाडीत जुगलबंदी रंगली आहे. माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर तोफ डागली. सोलापूर जिल्हा आणि पंढरपूर, मंगळवेढ्यातील जनतेने दाखवून दिले आहे की महाराष्ट्राची जनता आणि त्यांचा कौल भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आहे. माढा मतदासंघानंतर पंढरपूर धूळ चारणार हे मी अगोदरच सांगत होतो असे ते म्हणाले.

त्यांचे खायचे दात आणि दाखवयाचे दात वेगळे आहेत. मतदारसंघातील ३५ गावांना ते पाणी देणार नाहीत, ते पाणी पळवणार आहेत, हे निवडणुकीच्या प्रचारातच सांगत होतो. त्यांचे दाखवायचे दात हे निवडणुकीच्या दुसऱ्याच दिवशी दिसून आले. त्यांच्याकडील तिजोरीच्या चाव्या फक्त बारामती मतदारसंघापुऱत्याच उघडतात. इतर ठिकाणी माणसं नाही तर जनावरं राहतात, असं त्यांचं मत असतं, अशा शब्दांत खासदार निंबाळकरांनी अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला.

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी देखील अजित पवारांवर टीका केली आहे. ५०-६० हजार मताधिक्यांनी राष्ट्रवादी उमेदवार विजयी होईल असा दावा करण्यात आला होता. परंतु पंढरपूरच्या मतदारांनी त्यांना दाखवून दिलं. अजित पवारांना गर्व झाला होता तो मोडून काढला आहे असे त्यांनी म्हटले आहे.याचसोबत भाजपाची विजयी घोडदौड कायम राहील. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची गरज आहे. महाविकास आघाडीचा करेक्ट कार्यक्रम पंढरपूरच्या जनतेने केला आहे असंही गोपीचंद पडळकर म्हणाले.

महत्वाच्या बातम्या