fbpx

महाजणांच्या भेटीवर रणजीतदादांचा खुलासा, म्हणे कारखान्याच्या पाणीपट्टीसंदर्भात भेटलो

ranjeetsinh mohite patil

टीम महाराष्ट्र देशा: रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजप नेते आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्याने सध्या राजकीय गोटात चर्चेला उधान आले आहे. रणजीतदादा हे माढ्यात राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली नाही तर भाजपकडे चाचपणी करत असल्याचं बोलल जात आहे. मात्र महाजन यांची भेट हि सदाशिवनगर येथील शंकर सहकारी साखर कारखान्याच्या पाणीपट्टी संदर्भात घेतल्याचा दावा मोहिते पाटील यांनी केला आहे.

शरद पवार यांनी माढा लोकसभेतून माघार घेतल्यानंतर विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांना उमेदवारी मिळणार असल्याचं बोलल गेल. मात्र विजयदादा हे रणजितसिंह यांना उमेदवारी देण्याची मागणी करत आहेत. दुसरीकडे माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचे समर्थक देखील देशमुख यांना उमेदवारी मिळण्याचा दावा करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये रणजितसिंहानी गिरीश महाजन यांची भेट घेतल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत.

दरम्यान, आपण सोमवारी पुण्यातील राष्ट्रवादी कार्यालयातून महाजन यांना फोन करून कारखान्याच्या पाणीपट्टीसंदर्भात भेटायला येणार असल्याचे सांगितले होते. यावेळी जिल्हाध्यक्ष दीपकआबा साळुंखे यांच्यासह इतरही नेते माझ्यासमोर कार्यालयातच होत, असा खुलासा रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केला आहे.

2 Comments

Click here to post a comment