Share

Ranjeet Savarkar | “एका बाईसाठी पंडित नेहरुंनी देशाची फाळणी केली”, रणजीत सावकरांचा धक्कादायक आरोप

Ranjeet Savarkar | मुंबई : राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर वाद जोरदार पेटला आहे. यामध्ये सावरकर यांचे नातू रणजीत सावकर (Ranjeet Savarkar) यांनी देखील उडी गेतली आहे. यावेळी त्यांनी पंडित नेहरु (Pandit Nehru) यांच्यावर अतिशय धक्कादायक आरोप केला आहे. यामुळे वाद आणखीन चिघळण्याची शक्यता आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रा दरम्यान स्वांतत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

एका बाईसाठी नेहरुंनी देशाची फाळणी केली, असा आरोप रणजीत सावरकर यांनी केला आहे. माऊंट बॅटन यांच्या पत्नीसोबतचे नेहरुंचे पत्र व्यवहार समोर आणण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.

राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध संपूर्ण राज्यात केला जात आहे. या वक्तव्याचा निषेधार्थ ठाण्यात काल गुरुवारी ठाण्यातील बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिवसेनेच्या शिंदे गटाकडून राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले होते. बाळासाहेबांची शिवसेनेकडून राहुल गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिवसेनेच्या शिंदे गटाकडून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या :

Ranjeet Savarkar | मुंबई : राज्यात स्वातंत्र्यवीर सावरकर वाद जोरदार पेटला आहे. यामध्ये सावरकर यांचे नातू रणजीत सावकर (Ranjeet Savarkar) …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now