हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सेनेवर टीकेची झोड उठली असताना रणजीत सावरकर म्हणतात…

blank

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात मुख्यमंत्री पदामुळे युतीत बिघाडी झाली आहे. सोशल मिडीयावर शिवसेनेवर टीका केली जात आहे. या टीकेत प्रामुख्याने शिवसेना आता आघाडीसोबत जाणार असल्याने शिवसेना आता हिंदुत्वाचा मुद्दा बाजूला ठेवेल असे बोलले जात आहे.

महाराष्ट्राच्या सत्तापेचात काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी एक वेगळी आघाडी पुढे येण्याची अधिक शक्यता दिसत आहे. मात्र, काँग्रेस आणि शिवसेना हे दोन संपूर्ण वेगळ्या विचारसरणीचे पक्ष असल्याने हे कसे शक्य होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून सेनेवर टीकेची झोड उठली असताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर हे शिवसेनेच्या बचावासाठी उतरले आहे. काँग्रेससोबत गेल्यावरही उद्धव ठाकरे आपली हिंदुत्ववादी विचारसरणी सोडणार नाहीत, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत यांनी म्हटले आहे.

हिंदुत्वाबाबत काँग्रेसची असलेली भूमिका शिवसेना नक्कीच बदलेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.उद्धव ठाकरे यांना मी जेवढे ओळखतो, त्यावरून ते सत्तेसाठी आपली हिंदुत्ववादी विचारसरणी सोडणार नाहीत. तसेच, स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीवरूनही ते मागे हटणार नाहीत, असे रणजीत पुढे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या