एकता कपूरला पद्मश्री मिळतो, मग ऑलिम्पिकवीर पै. खाशाबा जाधवांना का नाही ?

टीम महाराष्ट्र देशा- केंद्र सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या पद्म-पुरस्कारांवरून आधी गायक अदनान सामीवर टीका झाल्याने वाद निर्माण झाला होता. आता दिग्दर्शिका एकता कपूर यांना हा पुरस्कार दिल्याने वाद निर्माण झाला आहे. एकता कपूरला पद्मश्री पुरस्कार मिळतो. मग माझ्या बाबांना का नाही?, असा सवाल भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधव यांचा मुलगा रणजीत जाधव यांनी केंद्र सरकारला केला आहे.

एकता कपूरला यंदा पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं. तिने नेमकं असं कोणतं सामाजिक काम केलं ज्यामुळे तिला हा मानाचा पुरस्कार देण्यात आला??, अशी खंत रणजीत जाधव यांनी व्यक्त केली.भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक मिळवून देणाऱ्या खाशाबा जाधव यांच्या मुलानेही, खाशाबांच्या बाबतीत होत असलेल्या उपेक्षेबद्दल आपली नाराजी व्यक्त केली. ते पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलत होते.

Loading...

१९५२ साली बाबांनी ऑलिम्पिकमध्ये पहिलं पदक जिंकलं. तुम्ही १९५४ ते १९८४ सालची पुरस्कार यादी पाहिलीत, तर अनेक क्रीडापटूंना पद्मश्री मिळाला आहे. काही जणांना पद्म-भूषण, तर काही जणांना तिन्ही मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. मात्र ध्यानचंद यांचा अपवाद वगळता एकही ऑलिम्पियन या यादीत नाहीये. महाराष्ट्रातील खासदारांनी संसदेत अनेकदा खाशाबा जाधव यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा याची मागणी केली, मात्र केंद्र सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही रणजीत यांनी केला.

गेली १९ वर्ष मी माझ्या वडिलांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी प्रयत्न करतो आहे. किमान त्यांच्या कार्याला मरणोत्तर पद्म-पुरस्काराने गौरवण्यात यावं. बाबांच्या निधनानंतर तब्बल १७ वर्षांनी त्यांना अर्जुन पुरस्काराने गौरवण्यात आलं. एकता कपूरला यंदा पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आलं. तिने नेमकं असं कोणतं सामाजिक काम केलं ज्यामुळे तिला हा मानाचा पुरस्कार देण्यात आला?? रणजीत जाधव यांनी आपली खंत व्यक्त केली.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

अजय देवगणजी खूप कमवल आता तान्हाजी मालुसरेंच्या वंशजांना आर्थिक मदत करा - मनसे
हे सरकार पडले तर 'आम्हाला' दोष देऊ नका...
व्याह्याला वाचवण्यासाठी संजय काकडेंची धडपड
आम्ही रात्रीच्या वेळी झोपूही शकत नाही ; आम्हाला येथे अजिबात सुरक्षित वाटत नाही
कीर्तने पोलीस बंदोबस्तात करावी लागतात हीच तर माझी दहशत - तृप्ती देसाई
...त्यामुळे पहिल्यांदाच मला सभागृहात बसावं असं वाटल - उद्धव ठाकरे
'अजित पवारांना पुन्हा आमच्याबरोबर यायचं दिसतंय'
अभिमान आहे सर तुमचा : संपूर्ण शहरात दहशत असणाऱ्या गुंडाच्या अनधिकृत बंगल्यावर मुंढेंचा हातोडा
'स्व. बाळासाहेब होते का स्वतंत्र लढ्यात', निलेश राणेंचा शिवसेनेवर पलटवार
...तर 'नितेश राणे' करणार मुख्यमंत्री 'उद्धव ठाकरें'चा सत्कार