‘कपबशी चोर’ काळ्या हीच तुझी लायकी ; राणेंचा राऊतांवर घणाघात

सिंधुदुर्ग : शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातून जनतेशी ऑनलाईन संवाद साधला. राज्यात सत्ता आल्यानंतरचा आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर पहिल्याच दसरा मेळाव्यात जनतेशी संवाद साधला. राज्यातली महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याच्या गोष्टी काहीजण करत आहेत. त्यासाठी तारीख पे तारीख देत आहेत. हिंमत असेल तर त्यांनी सरकार पाडून दाखवा, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं.

त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले होते की ‘आज मी मुख्यमंत्रीपदाचा मास्क बाजूला ठेवलाय. ज्याला कुणाला खुमखुमी आली असेल तर त्यांनी आजमावून पाहा. तुम्ही जर आमच्या वाटेला आलात तर तुम्हाला धडा शिकवला जाईल असा इशारा देखील विरोधकांना काल ठाकरे यांनी दिला. मुंबई, बिहार ते दिल्ली अशा सर्वच ठिकाणी उभ्या राहिलेल्या बाहुल्या, रावणी, काळी टोपी आणि बेडकी अशा उपमा देत विरोधकांना त्यांनी अक्षरशः सोलून काढले.

पण या सगळ्यात एक गोष्ट बऱ्याच लोकांच्या नजरेतून सुटली आणि तीच बाब नेमकी राणे यांनी ट्वीट करत माहिती दिली.

भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांनी दसरा मेळाव्यात घडलेल्या प्रकरणावरून शिवसेना नेत्याला टार्गेट केलं आहे.राणे म्हणाले की :

काल शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात विनायक राऊतची लायकी परत एकदा उद्धव ठाकरेनी दाखवली. सभा सुरू झाली आणि विनायक राऊतला स्टेजच्या खाली हाकलून दिलं. पराभव झालेले चद्रकांत खैरे व्यासपीठावर आणि काळया खाली. कपबशी चोर हीच लायकी तुझी.

महत्वाच्या बातम्या