एनडीएत असणारे ‘नारायण राणे’ सुद्धा आता स्वबळावर

कणकवली: काँग्रेसमधून सीमोल्लंघन करणारे आणि भाजपातील प्रवेशासाठी ताटकळत राहणारे नारायण राणे यांनी आज महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष कणकवली नगरपंचायत निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली. कणकवली नगरपंचायत निवडणूक कार्यालयाचे उद्घाटना प्रसंगी राणे बोलत होते.

स्वाभिमान पक्षाच्या कणकवली नगरपंचायत निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले. राणे यांनी कणकवली नगरपंचायत निवडणूक स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली. यावेळी आमदार आमदार नितेश राणे, सौ. नीलम राणे हे उपस्थित होते. नगराध्यक्षांसह सतरा नगरसेवक बहुमताने निवडून येतील. आघाडी-युतीची गरज दुबळ्यांना आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विरोधकांना चित करणार, असे राणे  कार्यक्रमात म्हणाले. पक्ष स्थापनेनंतर कणकवली नगरपंचायतीची ही पहिलीच निवडणूक असल्याने या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

 

You might also like
Comments
Loading...