राणे भाजपच्या वाटेवर असल्याने शिवसेना नेतृत्वात अस्वस्थता

Uddhav Thackeray, Narayan Rane

मुंबई :  माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश जवळपास नक्की असल्याने शिवसेनेचे नेतृत्व चांगलेच अस्वस्थ बनल्याचे सांगितले जात आहे . राणे यांच्यामुळे २०१९ ची लोकसभा निवडणूक स्वबळावर लढविण्याच्या भाजपच्या योजनेला चांगलेच बळ मिळेल असे मानले जात आहे .

शिवसेना नेतृत्व केंद्रातील मोदी सरकारवर आणि राज्यातील फडणवीस सरकारवर विखारी टीका करत असल्याने आणखी दोन वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला एकट्याच्या बळावर लढावे लागेल याची कल्पना प्रदेश भाजप नेतृत्वाला केंव्हाच आली आहे . त्यामुळेच येनकेन मार्गे आपले बळ वाढविण्याचा प्रयत्न भाजप नेतृत्वाकडून सुरु आहे . त्यासाठी पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस , राष्ट्रवादीचे स्थानिक वजनदार नेते भाजपने गळाला लावले आहेत . त्याचा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला चांगलाच फायदा झाला . कोल्हापूर , सोलापूर या सारख्या जिल्हा परिषदा , पिंपरी चिंचवड सारखी महापालिकाही भाजपच्या ताब्यात आली . शिवसेनेशिवाय लढायचे झाले तर नारायण राणे यांच्या सारखा मोहरा आपल्या पक्षात असलाच पाहिजे हे भाजप नेतृत्वाला कळून चुकले आहे . कोकणातील लोकसभेच्या दोन्ही जागी राणे यांचा भाजपला फायदा होऊ शकतो . सध्या कोकणातील भाजपचे अस्तित्व नाममात्र आहे . लोकसभा आणि त्यापुढे विधानसभा निवडणुकीतही राणेंचा भाजपला फायदा होऊ शकतो . काँग्रेस आणि शिवसेनेतील अनेक नेते आणि कार्यकर्ते राणे भाजपच्या गळाला लावू शकतात . एवढेच नव्हे तर मुंबई , ठाण्यातही राणेंचा भाजपला फायदा होऊ शकतो . राणे यांची ही ताकद ठाऊक असल्यानेच शिवसेना नेतृत्व अस्वस्थ बनले आहे. म्हणूनच राणेंच्या भाजप प्रवेशात अडथळे आणण्याचे प्रयत्न सेना नेतृत्वाकडून चालू असल्याचे सूत्रांनी सांगितले .

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
जेएनयू प्रकरणातील संशयित हल्लेखोरांची ओळख पटली,सत्य जाणून तुम्हालाही बसेल धक्का
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
संज्या राऊत म्हणजे थुंकून चाटणारा;संज्या म्हणजे 'मराठा'द्वेशी:निलेश राणे