राणे यांनी साथ सोडल्याचा काँग्रेसला राज्यात मोठा फटका – तटकरे

औरंगाबाद : नारायण राणे यांनी साथ सोडल्याने राज्यात काँग्रेसला मोठा फटका बसेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी औरंगाबादेत मांडले. सिंधुदुर्ग जिल्हयात राणे समर्थक मोठ्या प्रमाणात आहेत. नारायण राणे जुने मित्र असल्यामुळे राजकीय निर्णय घेताना ते माझ्याशी चर्चा करतात असेही ते म्हणाले.

शेतकरी कर्जमाफी, वाढती महागाई या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस सरकार विरोधात आंदोलन छेडणार आहे. या आंदोलनाची नेमकी दिशा ठरवण्यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत औरंगाबादमध्ये राष्ट्रवादी किसान सेलची बैठक घेण्यात येणार आहे, अशी माहिती तटकरेंनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी तटकरे म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यात आली. मात्र अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. सरकारच्या दिंरगाईमुळेच शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. सरकारने शिवाजी महाराज यांच्या नावाने कर्जमाफीची योजना जाहीर केली. औरंगाबदेत 5 नोव्हेबरला किसान सेलच्या नेत्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर सरकार विरोधी आंदोलनाची दिशा ठरवली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

You might also like
Comments
Loading...