चलो इनकी करे विदाई, भाजपाई और मंहगाई ; कॉंग्रेसने दिला नारा

टीम महाराष्ट्र देशा : मोदी सरकार जोपर्यंत पेट्रोल आणि डिझेल वस्तू आणि सेवाकरातंर्गत (जीएसटी) आणत नाही, तोपर्यंत काँग्रेससह विरोधी पक्षांचे जनआंदोलन सुरूच राहील, असा इशारा काँग्रेसने आज दिला. पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असल्याच्या निषेधार्थ आज विरोधी पक्षांनी भारत बंद पुकारला आहे. त्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत काँग्रेसचे प्रवक्ते रणदिप सुरजेवाला यांनी मोदी सरकार व भाजपावर हल्लाबोल केला. रूपया सध्या आयसीयूत आहे, पण हे सरकार आपल्याच धुंदीत जगत असल्याची टीका त्यांनी केली.

सरकार सत्तेवर येऊन ५२ महिने झाले आहेत. आता त्यांना निरोप देण्याची वेळ आली आहे. आता अच्छे दिन कधी येणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपाचे आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. जनता त्यांना निरोप देईन. चलो इनकी करे विदाई, भाजपाई और मंहगाई, अशा शब्दांत सुरजेवाला यांनी भाजपाला टोला लगावला.