रणबीर आता लग्नाची वेळ ‘आलिया’- ऋषी कपूर

टीम महाराष्ट्र देशा : रणबीर कपूर सध्या चांगलाच चर्चेत आला आहे ते त्याच्या ‘संजू’ या चित्रपटामुळे. त्याच्या करिअरला वळण देणारा हा चित्रपट ठरेल अशी सगळीकडे चर्चा रंगत असतांनाच अचानक सोशल मिडीयावर आलेल्या एका बातमीने सगळ्यांच लक्ष वेधून घेतलं आहे ते ऋषी कपूर यांच्या ट्विटने. रणबीर आणि त्याचा मित्र आयान मुखर्जीचा फोटो ट्विट करत लग्न करण्यासाठी हिच योग्य वेळ आहे त्यामुळे लग्नाचा विचार लवकर करा असा सल्ला या दोघांनांही ऋषी कपूर यांनी दिला आहे.

सध्या रणबीर अभिनेत्री आलिया भट्टला डेट करत आहे. काही दिवसांपूर्वी रणबीरनं आलियासोबतच्या प्रेमाची कबुली दिली होती.

‘चित्रपटसृष्टीत घराणेशाही नाही’- ऋषी कपूर