मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. आलियाने चाहत्यांसाठी एक सुखद धक्का दिला आहे. आलिया भट्टने तिच्या इंस्टाग्रामवरून एक फोटो शेअर केला आहे आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, ‘आमचं बाळ…लवकरचं येत आहे’. यावर नीतू कपूर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली होती. आता याबाबत रणबीर कपूरची बहीण रिद्धिमा कपूरला ही आनंदाची बातमी समजताच तिने सोशल मीडियावर पोस्ट केली. सध्या ही पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
आलिया भट्टने तिच्या गरोदरपणाची घोषणा करताच, रिद्धिमा कपूरला तिचा आनंद आवरता आला नाही. रिद्धिमा कपूरने इंस्टा स्टोरीवर आलिया आणि रणबीरचा एक क्यूट फोटो शेअर केला आहे. या फोटोवर रिद्धिमाने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘माझ्या बाळाचे स्वतःचे बाळ येणार आहे. मी तुम्हा दोघांवर खूप प्रेम करते. सध्या ही पोस्ट खूप चर्चेत आहे.
नीतू कपूरने दिली ही प्रतिक्रिया –
नीतू कपूर यांचा एक व्हिडीओ पापाराझींकडून पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये नीतू कपूरला पापाराझी शुभेच्छा देताना दिसत आहेत. ‘दादी बनने वाली हो’ असे एकाने म्हणताच त्यांनी धन्यवाद म्हणत आभार व्यक्त केले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. नेटकरी वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<