मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. आलियाने चाहत्यांसाठी एक सुखद धक्का दिला आहे. आलिया भट्टने तिच्या इंस्टाग्रामवरून एक फोटो शेअर केला आहे आणि कॅप्शन मध्ये लिहिले की, ‘आमचं बाळ…लवकरचं येत आहे’. या पोस्टच्या सगळीकडे जोरदार चर्चा सुरु आहेत. पण रणबीर कपूरने तीन दिवसांपूर्वी बाप झाल्याची गुड न्यूज दिली होती अशी माहिती आता समोर येत आहे.
२४ जून रोजी रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’ चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला. या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचवेळी रणबीर कपूर पत्रकार परिषदेत चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक गोष्टी बोलताना दिसला. यावेळी रणबीर म्हणाला ‘मला आता खूप काम करायचे आहे सर, आता मला कुटुंब बनवायचे आहे आणि त्यांच्यासाठी काम करायचे आहे. पूर्वी मी स्वतःसाठी काम करत होतो पण आता कटुंबासाठी काम करेल’. सध्या रणबीरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
दरम्यान, या दोघांना रणबीर कपूरची बहीण रिधिमा कपूर, आलियाची आई त्याचबरोबर अभिनेत्री परिणीती चोप्रा, प्रियांका चोप्रा, करण जोहर, टायगर श्रॉफ, वाणी कपूर, रकुल प्रीत सिंग, मौनी रॉय यांसारख्या कलाकारांनी या दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान रणबीर कपूर आणि आलिया भट्टने 14 एप्रिल रोजी लग्न केले होते. यांचे लग्न मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या ‘वास्तू’ बंगल्यावर झाले होते. रणबीर-आलियाने साधेपणानं केलेल्या लग्नाची खूप चर्चा झाली होती.
महत्वाच्या बातम्या :
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<