fbpx

ARJUNA RANATUNGA- २०११ वर्ल्डकप फाइनल ‘फिक्स’ होता: रणतुंगा

वेब टीम: भारत विरुद्ध श्रीलंका ही २०११ मधे झालेली वर्ल्ड कप फाइनल मॅच फिक्स होती. असा दावा श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगाने केला आहे. या सामान्याची चौकशी व्हावी अशी मागनीही त्याने केली आहे.
        आपल्या फेसबुक पेजवर एक विडिओ पोस्ट केला आहे. त्यात त्याने हा दावा केला आहे.२०११ मधे मुंबईतील वानखेड़े स्टेडियम मधे वर्ल्ड कप अंतिम सामना खेळला गेला होता. त्यात श्रीलंकेला नमवुन भारताने कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली तो सामना जिंकला होता. पन हाच सामना ‘फिक्स’ होता असा उल्लेख त्याने त्या वीडियो मधून केला आहे. मी या सामन्यात कमेंट्री करत होतो. जेव्हा आमचा पराभव झाला तेव्हा मात्र खुप दुख झाल. पन आम्ही हरलोच कसे..??असा प्रश्ननही मनामधे होताच. पन योग्य वेळ आल्यावरच हा सर्व प्रकार उघडकीस आणू असेही त्याने म्हंटले आहे.
श्रीलंकेने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात २७४ धावा केल्या होता. भारतापुढे २७५ धावांचे आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग झटपट बाद झाले. सुरुवातीला श्रीलंकेची सामन्यावर पकड होती. त्यानंतर भारताकडून सलामीवीर गौतम गंभीरने ९७ तर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने नाबाद ९१ धावांची अर्धशतकी खेळी करत सामना खेचून आणला.
         या सामन्यानंतर श्रीलंकेच्या स्थानिक माध्यमांनी आपल्या खेळाडूनी केलेल्या चुकांमुळेच सामना गमवावा लागला असा आरोपही करण्यात आला होता.याची कोणतीही चौकशी देखील करण्यात आली नाही. रणतुंगा सध्या श्रींलंकन सरकारमधे पेट्रोलियम मंत्री आहेत.