माढा लोकसभेच्या जागेवर राणेच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा दावा !

टीम महाराष्ट्र देशा : आगामी लोकसभेच्या निवडणुका जवळ येत आहेत. त्यानुषंगाने युती, आघाडी, जागावाटप यावर त्या त्या पक्षाच्या नेत्यांमध्ये बैठका होताना दिसत आहेत.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते, खासदार नारायण राणे यांनी सोमवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाली आहे. यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यामध्ये चर्चा झाली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीसाठी नारायण राणे यांच्या स्वाभिमान पक्षाने तीन जागांची मागणी केली आहे. यामध्ये रत्नागिरी-सिंधुदूर्ग, माढा आणि औरंगाबाद या तीन मतदारसंघांचा समावेश आहे. नारायण राणे यांचे पूत्र नीलेश राणे यांच्यासाठी रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघाची मागणी करण्यात आली आहे. याच मतदारसंघाचे त्यांनी याआधी प्रतिनिधित्व केले आहे.

माढा लोकसभेच्या जागेची राणेच्या स्वाभिमान पक्षाने मागणी केल्याने या मतदार संघाचा पेच आणखी वाढणार आहे. या मतदार संघातुन भाजपकडून सुभाष देशमुखांनी जोरदार तयारी केली आहे, त्यामुळे ही जागा स्वाभिमान पक्षाला दिली तर पेच निर्माण होणार आहे.Loading…
Loading...