नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मोतोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठणावरुन गोंधळ घातला होता. त्यानंतर खार पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. पोलीसांनी त्यांना अटक देखील केली होती. १२ दिवस तुरुंगात राहल्यानंतर राणा दाम्पत्याची सुटका झाली.
या सर्व प्रकरणात आयुक्त संजय पांडे चांगलेच चर्चेत होते. दरम्यान भाजपनेते किरीट सोमय्या यांनी टीका केली. मनसुख हिरेन प्रकरणात देखील किरीट सोमय्या यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. किरीट सोमय्या ठाण्यात मनसुख हिरेन यांच्या घरी भेट दिली. हिरेन यांची अँटेलिया स्फोटक प्रकरणानंतर हत्या करण्यात आली होती. किरीट सोमय्या यांनी शनिवारी हिरेन कुटुंबियांच्या भेटीनंतर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
मनसुख हिरेन प्रकरणानंतर ठाकरे सरकार तोंडावर पडले. या प्रकरणाला कधी न्याय मिळेल माहीत नाही. पण या प्रकरणात होणारे राजकीय आरोप-प्रत्यारोप शंका उपस्थित करणारे आहेत. तुम्हाला हा व्हिडीओ कसा वाटला आम्हाल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.