राणाजगजितसिंह पाटलांचा पक्षांतरावरून मोठा खुलासा, म्हणाले…

टीम महाराष्ट्र देशा : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्ष चांगलेच सक्रीय झालेले आहेत. तसेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते पक्षांतर करताना दिसत आहेत. अशातच पक्षांतर करणाऱ्यांच्या यादीमध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातील नेते राणाजगजितसिंह पाटील यांचाही समावेश आहे. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राणाजगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर येथे कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. यावेळी बोलताना त्यांनी ‘सध्या तरी कुठल्याच पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नाही. जनतेच्या व कार्यकत्यांच्या मते प्रतिक्रिया घेतल्यानंतर जो काही निर्णय घ्यायचा आहे तो सर्वांना विश्वासात घेवुन घेतला जाईल असं विधान पाटील यांनी केले. तसेच भाजप आणि शिवसेनेला मी त्यांच्याकडे यावे असे वाटतय असंही त्यांनी स्पष्ट केले.

Loading...

तसेच यावेळी अनेकांनी प्रवेशाबद्दल मते व्यक्त केली. अनेकांनी दादा घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असल्याचे सांगितले तर जवळपास साठ टक्के कार्यकत्यांनी भाजपा प्रवेशा बाबतीत सकारात्मकता दाखवली यावेळी अनेक कार्यकत्यांनी दादा तुम्ही तुळजापूर विधानसभा निवडणूक लढवा म्हणताचं स्मित हास्य करुन या बाबतीत प्रतिक्रिया देण्याचे टाळले .

यावेळी नगराध्यक्ष बापुसाहेब कणे, दिपक आलुरे, विक्रमसिंह देशमुख, वसंत वडगावे, विनोद गंगणे, विजय गंगणे, उत्तम लोमटे, नगरसेवक सचिन रोचकरी, विजय कंदले, बाळासाहेब शिंदे, जि.प.सदस्य राजकुमार पाटील, पंचायत समिती सदस्य शरद जयदाडे, चित्तरंजन सरडे, अमर चोपदारसह पदाधिकारी, नगरसेवक, सरपंच उपसरपंच, सोसायटी चेअरमन, सह कार्यकते मोठ्या संखेने उपस्थित होते.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

रोड कंत्राटदाराकडून कमिशन मागणाऱ्या महाराष्ट्रातल्या ७ खासदारांची आणि १२ आमदारांची होणार चौकशी
'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
मोठाभाई ‌खूपच व्यस्त;अजिबात वेळ नाही जाणून घ्या काय आहे कारण
भिडेंच्या सांगली 'बंद'ला राऊतांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
आमच्या दैवताबद्दल जो अपशब्द काढेल त्याची जीभ जागेवर राहणार नाही
महाराष्ट्राचा ढाण्या वाघ जाणार बेळगावात
रोहित पवार.... नाव तर ऐकलच असेल, पवारंनी लावला थेट मोदींना फोन
राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर पोलिसांच्या ताब्यात
भाजपचा 'हा' नेता भेटला अजित पवारांना;राजकीय तर्कवितर्कांना उधान
सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र आहे म्हणणाऱ्या सुळेंवर निलेश राणेंनी डागली तोफ