उस्मानाबाद : आ.राणा जगजितसिंह पाटील यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब

उस्मानाबाद : लोकसभेला राष्ट्रवादी-कॉंग्रेसकडून आ.राणा जगजितसिंह पाटील यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. उस्मानाबाद लोकसभेला सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून पद्मसिंह पाटील हे उभा राहणार नसल्याने त्यांच्या जागी नवीन उमेदारांची चाचपणी सुरु होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील यांची उमेदवारी फिक्स झाल्याचे कळते आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात डॉ. पद्मसिंह पाटील म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस असे समीकरण आहे. अनेक नावे चर्चेत असली तरी यावेळीही पद्मसिंह पाटील किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी मिळणार असल्याचं चित्र होतं.

शिवसेनेने या मतदार संघात विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना डावलत माजी आ.ओमराजे निंबाळकर यांना संधी दिली आहे. गायकवाड यांना गेली पाच वर्ष ‘नॉटरीचेबल’ राहणे महागात पडले आहे.